बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव या आदर्श विद्यालयाने यशस्वी परंपरा राखत सन
2025- 26 या वर्षात एन. एम. एम . एस. या परीक्षेत मोठे संपादन केले. एकूण आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून इ. 9 वी ते 12 वी पर्यंत त्यांना रुपये 48000/अशी शिष्यवृत्ती मिळेल.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे , प्रभात पवन गायकवाड -146, चैतन्य सुरेश चव्हाण -145 , अन्विका सागर जाधव -144 ,रुचिता राजकुमार नौगण-143,जोया समीर मुल्ला -136,आर्या अमोल ढोले -132, हितांशा संजय माने - 117,साक्षी सागर मदने - 111
मुख्यमंत्री माझ्या माझी शाळा अभियान टप्पा क्र. 2 मध्ये खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून विविध स्पर्धा परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी नेहमी मोठे संपादन करत असतात. उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हाभर परिचित असणारी ही शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता दिशादर्शक ठरली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब जाधव, सचिव श्री. मोहनराव जाधव, खजिनदार श्री.लक्ष्मणराव जाधव तसेच सर्व विश्वस्त आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प पदाधिकारी श्री . के. डी.पवार सर, श्री डी.पी.शिंदे सर,श्री एस. आर.पाटील सर, तसेच श्री जयंतराव जाधव यांचे वतीने तसेच शाखेतील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे पुसेगाव येथील सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग व सर्व समित्यांमधील सदस्याकडून मुख्याध्यापक श्री डी. एन., गोफणे ,पर्यवेक्षक श्री. एम. पी. गुरव ,विभागप्रमुख श्री जे.बी. जाधव
तसेच एन. एम एम . एस . विभाग प्रमुख श्री. ए . एस . पाकले व सर्व मार्गदर्शक शिक्षक सौ अमृता जाधव, सौ. ज्योती गुरव, कु. योगिनी लावंड, यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.





Social Plugin