प्रविण पिपरे @ग्रामीण प्रतिनिधी
दि. 15 ऑक्टोबर 2026 चामोर्शी
भेंडाळा परिसरातील 14 गावातील सुपीक जमीन JSW कंपनीच्या लोह प्रकल्पासाठी MIDC मार्फत अधिग्रहित करण्याच्या हालचालींविरोधात शेतकऱ्यांनी आज चामोर्शीत मोठा एल्गार पुकारला.
*शेतकरी बचाव जनआंदोलन समिती व महिला समिती, भेंडाळा परिसर चामोर्शी* यांच्या नेतृत्वात आज सकाळपासून *रस्ता रोको आंदोलन* करण्यात आले. आंदोलनात 14 गावांतील हजारो शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे - *"जमीन आमच्या हक्काची, निर्णयही आमच्या संमतीचा!"*
> चामोर्शी शहरातील लक्ष्मीगेट परिसरात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.
*शेतकऱ्यांच्या मागण्या:*
1. भेंडाळा परिसरातील 14 गावांतील सुपीक जमिनीचे अधिग्रहण तात्काळ रद्द करावे.
2. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसोबत सामूहिक बैठक घ्यावी.
3. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये.
भेंडाळा, घारगाव, रामाला, फोकुर्डी, दोटकुली, खंडाला, वाघोली, सगनापूरसह एकूण 14 गावांतील सुमारे 3504 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे. ही जमीन बारमाही बागायती असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे





Social Plugin