Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव पेठच्या उपसरपंचपदी कदीर शब्बीर सय्यद यांची बिनविरोध निवड



पिंपळगाव पेठ  (प्रतिनिधी) : पिंपळगाव पेठ (ता. सिल्लोड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. कदीर शब्बीर सय्यद यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी (ता. २६ ऑक्टोबर) पार पडलेल्या विशेष ग्रामपंचायत सभेत ही निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या सभागृहात सोमवारी दुपारी २ वाजता निवडीसंदर्भातील सभेला सुरुवात झाली. सर्व सदस्यांच्या एकमताने श्री. कदीर शब्बीर सय्यद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुपारी ३ वाजता निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी श्री. काशिनाथ ताठे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली. या निवड प्रक्रियेत तलाठी श्री. दीपक बागुल आणि ग्रामविकास अधिकारी श्री. महाकाळ यांनी साहाय्य केले.

श्री. कदीर सय्यद यांच्या बिनविरोध निवडीची बातमी समजताच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल मा . मंत्री आमदार श्री. अब्दुल सत्तार, नगराध्यक्ष श्री. अब्दुल समीर अब्दुल सत्तार,  गटनेता श्री. नंदकिशोर सहारे, सिल्लोड बाजार समितीचे सभापती श्री. विश्वासराव दाभाडे,जेष्ठ नेते सुखदेव पा जाधव, गट प्रमुख श्री. हनीफ भाई मुलतानी,सरपंच श्री. दिलीप जाधव,श्री. जमीर मुलतानी,मा.उपसरपंच राजू बेलेवार,ग्रा.प.सदस्य ईश्वर पा भोसले,राजू फुले,मा सरपंच पंडित पा कोके, नारायण पा भोसले,डिगंबर पा भोसले, फारूक सय्यद,अप्पा पा भोसले,शिवाजी पा कोके,बबुराव पा भिसले,रसुल मिर्झा, सोनाजी बेलेवर,विजय बेलेवर,मनोहर भोसले,जुबेर मिर्झा,आकाश कोके,कैलास गुंजाळ,काशीनाथ फुले,ज्ञानेश्वर जाधव,सुभास लोनकर,मारोती पा भागवत,दउत शहा,आमोल बेलेवार, यांच्यासह  गावाकरी प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केले.

विकासाला गती मिळण्याची अपेक्षा या बिनविरोध निवडीमुळे गावाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. नवनियुक्त उपसरपंच श्री. कदीर शब्बीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात गावात विविध लोकोपयोगी व विकासात्मक उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.