बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथे सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच वाणिज्य विभाग आणि प्लेसमेंट सेल यांच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास, करिअरविषयक मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. स्वच्छता मोहिमेतून स्वच्छतेचा संदेश सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुसेगाव येथील स्मशानभूमी आणि नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.
याचबरोबर पुसेगाव गावातून स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून ग्रामस्थांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, नदीघाटाचे प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे याविषयी जागरूक करण्यात आले. या उपक्रमात पुसेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामअधिकारी श्री. ए. जे. नागरगोजे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, डॉ. संजय क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण कुंभार व डॉ. हनुमंत निमसे तसेच राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य सहभागी झाले. सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्ती विकसित व्हावी, या उद्देशाने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. श्रीमती मनुजा सोनार यांनी केले.
स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला, कल्पकता आणि विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि सर्जनशील दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत करिअर समुपदेशन कार्यक्रम महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर समुपदेशन ’ या
विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर होते, तर डॉ. मारुती वाघ यांनी मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील विविध संधी, रोजगाराच्या उपलब्ध शक्यता, व्यावसायिक विकास आणि योग्य करिअरची निवड यांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्ये ओळखून करिअरची दिशा निश्चित करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अश्विनी कांबळे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता, सांस्कृतिक अभिरुची आणि करिअरविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता. रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतून ‘स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि कौशल्यविकास’ या मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. महाविद्यालयाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे राबविलेल्या या उपक्रमांमुळे सेवा संकल्प अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.





Social Plugin