प्रतिनिधी : मनोहर खंदारे देऊळगाव राजा
देऊळगाव राजा शहरात अपघात टाळण्याच्या उद्देशाने करोडो रुपये खर्च करून दुभाजक लावण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावर पुरेसा प्रकाश असावा याच दुभाजकावर सोलरचे विद्युत खांब बसविण्यात आलेले आहे
परंतु शहरातील काही नागरीक या दुभाजकावर असलेल्या सोलर विद्युत खांबावर बेकायदेशीर बॅनर लावतात.त्या मुळे रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूने वळण घेत असता समोरून येणारे कोणत्याही प्रकारचे वाहन दिसत नाही. परिणामी त्यात अपघात होण्याची शक्यता ही दाट असते अनेक अपघात त्या ठिकाणी झाले तरी नागरिकांच्या जीविताशी हा खेळ असून या कडे प्रशासनाने लक्ष्य द्या वे अशी मागणी बलवंतसिंग दिलीपसिंग बावरे यांनी मा. श्री. नकवाल साहेब, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद देऊळगाव राजा यांना निवेदना मार्फत विनंती केली आहे





Social Plugin