बालचिमुकल्यांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
आष्टी, प्रतिनिधी, नटवर महाजन
: बालचिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अष्टविनायक तरुण मित्र मंडळ, धामणगाव यांच्या वतीने शनिवार, दि. १७ व रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाजार तळावर सायंकाळी ६:३० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत रंगणाऱ्या या सोहळ्यात बालवाडी ते इयत्ता आठवीपर्यंतचे विद्यार्थी नृत्य, गायन, अभिनय आदी कलाविष्कार सादर करणार आहेत.
धामणगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpg)




Social Plugin