Ticker

6/recent/ticker-posts

समता सैनिक दल वर्धापन दिनानिमित्त आयोजित - 13 मार्च च्या रॅलीसाठी तालुका पदाधिकाऱ्यांचा जोमात प्रचार


चाळीसगाव ( अनिल राठोड ) 

दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मिटिंग मध्ये चाळीसगांव तालुका उपाध्यक्ष अभिजित निकम यांनी सहकाऱ्यांना घेवून देवळी , आडगाव , दडपिंप्री या गावात लोकांशी संपर्क साधून रॅली चा प्रचार केला. तालुका संपर्क प्रमुख नाना घोडेस्वार यांनी दहीवद , करमुड, राजमाने या गावात सम्पर्क अभियान राबविले. त्याचप्रमाणे तालुका सम्पर्क प्रमुख रविंद्र सुभाष जाधव यांनी वाघले , कोंगानगर या गावात रॅली चा प्रचार केला.

   चाळीसगांव शहरात १३ मार्च रोजी होणाऱ्या मोटासायकल रॅलीसाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी व  नागरिकांनी मोटार सायकल घेऊन  सहभागी होण्याचे आवाहन या संपर्क अभियानात करण्यात आले.आहे