चोहोट्टा बाजार प्रतिनिधी सुनिल बांगर
: सध्या घरकुलांसाठी मिळणारे अनुदान महागाईमुळे तुटपुंजे ठरत आहे. वाढलेले साहित्याचे दर, मजुरी व खर्च लक्षात घेता घरकुलाचे अनुदान ३ लाखांपर्यंत वाढवून द्यावे, अशी मागणी लाभार्थीकडून होत आहे. गरजू व गोरगरीब हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, त्यांना स्वतच्या हक्काच्या घरात राहता यावे, यासाठी शासनाकडून पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व इतर आवास योजना राबविण्यात येतात. सद्यस्थितीत मोदी आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र, या योजनेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान अत्यल्प आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.
घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य सिमेंट, वाळू, विटा, लोखंड व मजुरांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.प्रचंड महागाईमुळे घरकुल लाभार्थी अडचणीत आहेत, शासनाकडून मिळत असलेल्या अनुदानात घर बांधू शकत नाही. त्यामुळे घरकुल योजनांचे अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे. कमी अनुदानामुळे लाभार्थ्यांची अडचण होत आहे.
बांधकाम साहित्यांच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहेत.परंतु, अनुदानाच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आलेली नाही, एवढ्या अल्पशा अनुदानात घरकुलाचे बांधकाम होत नाही, त्यामुळे घरकुलाच्या अनुदानात तीन लाखांपर्यंत वाढ करण्यात यावी. - स्वाती विनोद वसु, ग्रा. पं. सदस्य, टाकळी बु





Social Plugin