प्रतिनिधी: शंकर निंबारे, देवडोंगरी

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा नाशिक अंतर्गत राज्य बाहेरील शेतकरी अभ्यास दौरा (सहल) त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन रवाना झाली. दि.५ रोजी  कर्नाटक राज्यातील मैसूर शहरात सहल दाखल झाली. प्रथम सकाळी मैसूर येथील केंद्रीय अन्न संशोधन केंद्रास भेट दिली. दुपारनंतर कावेरी सिल्क अँन्ड हॅन्डीक्राॅप उद्योगस भेट दिली तसेच मैसूर पॅलेस या पर्यटन स्थळास भेट देऊन चांमुंडामातेचे दर्शन शेतकरी सहलीने घेतले. नंतर परती वेळी मैसूर वृंदावन गार्डन मध्ये खेळीमेळीच्या वातावरण आनंद घेतला असा शेतकरी सहलीचा तिसरा दिवस मोठ्या आनंदात संपन्न झाला. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन पन्नास शेतकरी व कळवण तालुक्यात मधुन पन्नास शेतकरी एकुण शंभर शेतकरी बांधव होते. शेतकरी अभ्यास दौरा सहल यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कृषी सहायक हरिदास पवार, संतोष गाडर यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच श्रीराम यात्रा कंपनीच्या मार्गदर्शनाने मैसूर मधील माहिती शेतकऱ्यांना दिली. पुढील चार दिवसांत बंगलुर, हैदराबाद, या ठिकाणी शेतकरी अभ्यास दौरा (सहल) होणार आहे.