कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी मंठा.
मंठा: यशस्वी कोचिंग क्लासेस मंठा येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन क्लासेसचे संस्थापक श्री. अमोल ठोकरे सर व त्याचे सहकारी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून या कोचिंग क्लासेसचे श्री. समाधान गडदे, तर प्रमुख अतिथी प्रा. अशोक माथने सर (स्वामी विवेकानंद कॉलेज मंठा ) व श्री. प्रशांत काळे सर (पोलीस कॉन्स्टेबल मंठा) हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा व उज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीताने झाली, त्या नंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. अशोक माथने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की,अभ्यासा शिवाय कोणतीही गोष्ट या जगात प्राप्त होऊ शकत नाही. आपण सध्या विद्यार्थी आहोत आणि आपण जे ठरवु ते होऊ शकतो, पण आधी ठरवीणे गरजेचे आहे. आपण शिक्षण घेऊनच मोठे होऊ शकतो व कोणतेही पद मिळवु शकतो, तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या नंतर या क्लासेस चे संस्थापक अमोल ठोकरे सर आणि श्री. बालासाहेब जीवने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी हे सागितले की, आपण कठोर मेहनत व अभ्यास करून काहीही मिळवु शकतो, त्यामुळे राहीलेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व परीक्षेत चांगले गुण घ्यावेत व वेळेचे नियोजन करुन प्रत्येक विषयाला सारखा वेळ द्यावा. आपल्या आई-वडिलांच्या सुचना आणि संस्काराचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वेळीच ध्येय निश्चित केले तर आपल्याला काय मिळवायचे आहे हे निश्चित करता येईल व यश प्राप्त करता येईल. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रास्ताविक अमोल ठोकरे यांनी केले. निरोप समारंभाच्या या कार्यक्रम प्रसंगी यशस्वी कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





Social Plugin