Ticker

6/recent/ticker-posts

शेकऱ्यांच्या न्याय्यहक्कासाठी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने लोणार तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने



लोणार : अनिल वायाळ प्रतिनिधी          

 शेतकऱ्यांच्या न्याय्यमागण्या साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर 7 मार्च रोजी दुपारी 11 वाजेपासून जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आले. लोणार मेहकर तालुक्यातील शेतकरी यांच्या सोयाबी कपासी ला योग्य भाव दया. गारपीटीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या. दुष्काळी अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या. अशा अनेक मुद्द्यांना घेऊन तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले

 तहसील कार्यालयावर सकाळी ११ वाजे पासून तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला  आंदोलनात शिवसेना ऊबाठा  जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, लोणार तालुकाप्रमुख ऍड दीपक मपरी, शहर प्रमुख गजानन जाधव सर, कृ.उ.बा.स. संचालक विजय मोरे, तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, युवातालुकाधिकारी जीवन घायाळ, तालुका संघटक कैलास अंभोरे, महिला विधानसभा प्रमुख संजीवनी वाघ, पार्वतीताई सुटे, रंजना बच्छिरे, यशोदाताई पाठे, युवा शहरप्रमुख श्रीकांत मदनकर, प्रकाश सानप, सुदन अंभोरे, राजुभाऊ बुधवत, तानाजी मापारी, लुकमान कुरेशी, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख उमर सय्यद, युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे, तानाजी अंभोरे, अश्रुबा धारकर, माणिकदादा जायभाये, संजय राठोड, मोहन इंगळे, राजू दहातोंडे, रामा मोरे, गफार शहा, लालूभाई मुल्लाजि, राजू दहातोंडे, विठ्ठलराव घोडके, भगवान कायदे, राजू फोलाने भागवत दहातोंडे, ज्ञानेश्वर सरोदे, अजय बछिरे, सुनील पसरटे  किरण कमडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात आंदोलन स्थळी उपस्थित होते.