भोकरदन तालुक्यातील कुंभारी परीसरातील घटना
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
मोबाईल बॅटरीचा विस्फोट (mobile battery explosion) होऊन पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावा जवळील एका वाडीत घडली आहे. समर्थ परशुराम तायडे, (वय ५ ,रा.आमठाणा, ता.सिल्लोड) असे बालकाचे नाव आहे.
या विषय सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जालना रोडवरील कुंभारी गाव आगोदर एक वाडी आहे. या ठिकाणी गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी झाला होता कार्यक्रम आटोपून दि.४.मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र त्यांचा मुलगा समर्थ हा इतर मुलांबरोबर खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी बालकाने कानाला लावली. त्याच क्षणी त्याचा अतिशय भयानक स्फोट होऊन यात समर्थच्या कानाला व हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्याला येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले.
सदरील घटनेमुळे संपुर्ण परीसरात हळहळ वक्त होत आहे. घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान तायडे कुटुंबाची घरची परीस्थीती हलाखीची असल्याने समर्थ याचे वडील मोलमजुरी करतात. या घटनेची नोंद भोकरदन पोलिस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास सपोनि बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.





Social Plugin