कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हा अचानक गारठला असून, पहाटेच्या वेळेस नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे. सोमवारी नाशिक शहरात राज्यात सर्वाधिक कमी १२.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
तसेच नाशिकपासून अंदाजे १०० कीमी असणाऱ्या मालेगावात एकदम विरुद्ध उष्ण तापमान नोंदविले गेले. मालेगावात सर्वाधिक ३७.४ अंश इतके तापमान नोंदिवले गेले. या दोन्ही शहरातील वातावरण एकदम विरुद्ध जाणवत आहे. मालेगावात प्रचंड ऊन जाणवत आहे. तसेच नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. पहाटेच्या वेळेस अचानक तापमान कमी झाल्याने, शहर व परिसरातील मळे भागात राहणाऱ्या जनतेला शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.वातावरण बदलामुळे सर्दी पडसे थंडी ताप यासारखे संसर्गजन्य आजार जाणवू लागले आहेत.
.png)




Social Plugin