वाई प्रतिनिधी, राहुल पिसाळ
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या येथील श्री काळभैरवनाथाच्या यात्रेतील परंपरागत व वैशिष्ट्यपूर्ण बगाडाची मिरवणूक येत्या शनिवारी (ता. ३०) रंगपंचमीला निघणार आहे. यावर्षी बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी येथील विकास तानाजी नवले (वय ३२) यांना मिळाला आहे.
बावधन येथे दर वर्षी फाल्गुन महिन्यात तीन दिवस ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची यात्रा भरते. यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक असे कार्यक्रम होतात. या वेळी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पौर्णिमेच्यादिवशीच्या रात्री १२ वाजल्यानंतर बगाड्या ठरविण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपरिक पद्धतीने कौल लावत असतात. यावर्षी एकूण ५१ नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते. यातील सहाव्या क्रमांकावर असलेल्या विकास तानाजी नवले (शेलारवाडी, रा. बावधन) यांच्या बाजूने देवाने प्रसाद दिला असून, त्यांना यंदाचा बगाड्या होण्याचा मान मिळाला आहे. बगाड्या विकास नवले यांचे थोरले बंधू वैभव नवले
मध्ये बहिणीला मुलगा व्हावा म्हणून नाथांच्या चरणी नवस केला होता. गेले सात वर्ष ते नाथांचा प्रसाद घेण्यासाठी बसत होते, या वर्षी बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. या वेळी काशिनाथाचं चांगभलं, असा गजर करत बगाड्याच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर बगाड्याने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. विकास नवले हे सध्या शिरवळ येथील कंपनीमध्ये नोकरीला आहेत.
माझ्या भावाने बहिणीला मुलगा होऊ देत म्हणून २०१० मध्ये नाथांना नवस केला होता आणि तो पूर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले, त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि मी हे बगाड आनंदाने गावापर्यंत आणीन. - विकास नवले, बगाड्या





Social Plugin