छायाचित्र - पुसेगाव - हवामान बदल आणि शाश्वत शेतीचा विकास या विषयावर मार्गदर्शन करतात डॉ .सतीश करंडे, व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर ,श्री .आकाश पाटील ,श्री. अमोल बोचरे छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
डॉ. सतीश करंडे
बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
हवामान बदलाचा शेती व्यवसायावर मोठा परिणाम होत असून अनियमित पाऊस, बदलते तापमान आणि जमिनीची घटती सुपीकता यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती व्यवसायातील नवीन आव्हाने निर्माण झाली आहे असे प्रतिपादन डॉ सतीश करंडे, मुख्याधिकारी आणि सल्लागार, शाश्वत शेती विकास मिशन, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांनी केले.पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय व एम.के.सी.एल आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने " हवामान बदल आणि शाश्वत शेतीचा विकास" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुनील हेळकर,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर श्री. आकाश पाटील श्री. अमोल बोचरे इत्यादी उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात डॉ. करंडे म्हणाले,' हवामान बदलामुळे शेतीच्या उत्पादनावर तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत आहे. तसेच आहाराची वाढती गरज लक्षात घेता तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळले पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान, नवीन कृषी पद्धती आणि कौशल्यधारीत शेतीमुळे विद्यार्थ्यांसाठी नवा करिअरचा मार्ग निर्माण झालेला आहे. असे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर म्हणाले ,'मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून शेतीचा विकास झाला असून मानवी जीवनाच्या जडणघडणीत शेतीचे योगदान अनन्य साधारण आहे. शेतीच्या विकासामध्ये महिलांचा सहभाग मोठा असून ग्रामीण भागात शेतीच्या विकासाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा स्वीकार करून जमिनीचे आरोग्य, पर्यावरण संतुलन आणि शेतीची उत्पादकता टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अग्रणी महाविद्यालय कमिटीचे प्रमुख प्रा. एल.के.पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.आर.धोंगडे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ.किरण कुंभार यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin