छायाचित्र - शिक्षक दिन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना अँड. किसन खामकर, व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, प्रा .डॉ.संजय क्षीरसागर, प्रा. श्रीमती मनुजा सोनार , प्रथमेश दळवी छाया - प्रकाश राजेघाटगे
शिक्षक समाजाच्या विकासाचा आधारस्तंभ...अँड. किसन खामकर.
बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत असले तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे शिक्षकांचे महत्त्व कधीही कमी होत नाही. तंत्रज्ञानाबरोबर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरत असते कारण शिक्षक हाच समाजाच्या विकासाचा आधारस्तंभ असतो असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अँड किसन खामकर यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित केला होता. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर प्रा.डॉ.संजय क्षीरसागर प्रा.श्रीमती मनुजा सोनार ,प्रथमेश दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात अँड खामकर म्हणाले,'गुरु व्यक्तीला जीवनातील अंतिम ध्येयापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग दाखवितो. त्यामुळे गुरूंचा आदर करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. आई-वडिलांचे उपकार जीवनभर महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदान आणि उपकार महत्त्वाचे असतात त्यांनी गुरु - शिष्य परंपरेचा संदर्भ देताना भारतीय संस्कृतीतील ऋषीमुनी, पांडवांच्या जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित केले .व्यक्तीच्या जीवनाला योग्य आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गुरु कडून होते. शिक्षकांच्या माध्यमातून चांगली आणि संस्कारक्षम पिढी घडत असते असे त्यांनी सांगितले. शिक्षकाकडून मिळणारे ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन आणि आलेले अनुभव विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देतात शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस नसून गुरु - शिष्य नात्याचे महत्व अधोरेखित करणारा दिवस आहे. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर म्हणाले,'समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देऊन त्यांना जीवनाची दिशा देतो.शिक्षक हा समाजाचा आदर्श व मानबिंदू असतो तसेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या निरागस भावनांना समजून घेत त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करून त्यांच्या विचारांचा आणि संस्काराचा जीवनात अंगीकार करावा असे आवाहन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून घडणारी पिढी समाजाच्या विकासाला योग्य दिशा देऊ शकते असे सांगितले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे व विद्यार्थी शिक्षकांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कु. प्रशांती वलेकर बी.ए .भाग २ कु. गुंजवटे निशा बी.कॉम भाग 3 प्रा.डॉ.एन. डी. लोखंडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.अनिल जगताप यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.एस. आर. धोंगडे यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्रीमती मनुजा सोनार यांनी मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin