Ticker

6/recent/ticker-posts

भैरवनाथ तरुण मंडळ निरगुडी आयोजित जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.


प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

  दि.१०  भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने महात्मा फुले नगर निरगुडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा आणि संगीत खुर्ची व लिंबू चमचा या स्पर्धांचे आयोजन केले होते. संगीत खुर्ची स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी पैठणी साडी सौजन्य- गणेश गोरे फलटण तालुका होलार समाज अध्यक्ष,

 द्वितीय क्रमांकासाठी टिफीन डबा- सौजन्य संदीप गोरे,

तृतीय क्रमांकासाठी गोल्डन पर्स - सुनिल गोरे यांनी तसेच लिंबू चमचा या स्पर्धेसाठी स्वामीनी डेकोरेशनचे सर्वेसर्वा यांनी स्टेनलेस स्टील बॉटल अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून केली. महात्मा फुले नगर मधील महिलांनी स्पर्धेमध्ये आनंदाने भाग घेऊन स्पर्धा उत्साहात पार पाडली. 

 संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक निलम अमोल गोरे यांनी मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक राजश्री संदीप सस्ते यांनी टिफीन डबा आणि तृतीय क्रमांक  शितल सुरज गोरे यांनी गोल्डन पर्स  अशी बक्षिसे पटकावली तसेच लिंबू चमचा या स्पर्धेमध्ये निलम अमोल गोरे यांनी  प्रथम क्रमांक पटकावून स्टेनलेस स्टील बॉटल हे बक्षीस पटकावले. बक्षिसांचे वितरण निरगुडी गावच्या सरपंच कोमलताई सचिन सस्ते, उपसरपंच सारिका महावीर बनसोडे आणि आडके मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अजित  गोरे यांनी दिलेल्या गुलाबपुष्पांनी महिलांचा सन्मान केला.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गोरे यांनी केले. सुरज गोरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी युवक नेतृत्व सचिन सस्ते, महावीर बनसोडे, निलकुमार गोरे, अभिजित गोरे, भिकाजी गोरे गणेश गोरे, शंभूराज गोरे, तुकाराम आवटे,लहु गोरे, प्रविण गोरे, रघुनाथ गोरे,बारिक गोरे, सुनिल गोरे,देवराज गोरे,अक्षय आवटे,यश गोरे,अमित आवटे, आदेश गोरे ,सागर गोरे, अनिल गोरे तसेच महात्मा फुले नगर मधील सर्व महिला वर्ग उपस्थित होता.