मंठा: मंठा येथे प्रथमेश कोचिंग क्लासेसच्या वतीने संत तुकाराम नगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांन साठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन या क्लासेस चे संस्थापक प्रल्हाद खरात यांनी केले होते. या कार्यक्रमाला च्या सुरुवातीला प्रतिमा पुजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोरे हे होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री. मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यानी सागितले की, विद्यार्थीनी आपल्या जीवनात सुरूवातीला ध्येय ठरवणे गरजेचे आहे. ध्येय ठरविल्या वर त्या साठी नियोजन व अभ्यास करणे गरजेचे आहे.अभ्यास शिवाय कोणतीही गोष्ट या जगात प्राप्त होऊ शकत नाही. आपण सध्या विद्यार्थी आहोत आणि आपण जे ठरवु ते होऊ शकतो, पण आधी ठरवीणे गरजेचे आहे. आपण शिक्षण घेऊनच मोठे होऊ शकतो व कोणतेही पद मिळवु शकतो, तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्या नंतर या क्लासेस चे संस्थापक प्रल्हाद खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यानी हे सागितले की, आपण कठोर मेहनत व अभ्यास करून काही ही मिळवु शकतो, त्यामुळे राहीलेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास हा करावा व परीक्षेत चांगले गुण घ्यावेत, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षे साठी खुप खुप त्यांनी दिल्या. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जयश्री पौळ, गायत्री गोरे, श्रद्धा गोरे, दिक्षा राठोड व महेश कदम या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सुञसंचालन सुभाष वायाळ यांनी केले. समारंभाच्या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित या कोचिंग क्लासेसचे खरात मॅडम,कापुरे मॅडम, तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin