Ticker

6/recent/ticker-posts

शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवणे काळाची गरज: प्रा. डॉ. रवींद्र काळबेरे

' प्रोग्रेसिव्ह' मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व बाल मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी/प्रशांत सोनवणे 

दि.(कोळकी) २८ फलटण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज कोळकी मध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली.  त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व सर सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनल चे गव्हर्नर श्री.भोजराज नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजनी देवी नाईक निंबाळकर, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. रवींद्र काळेबेरे, युवा उद्योजक श्री.सचिन माने, लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या प्रा.सौ.नीलम देशमुख, व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, सौ.स्वाती चोरमले,सुनंदा कदम, सौ.उज्वला निंबाळकर,सौ.शारदा भोसले,सौ.सुनिता निंबाळकर, सी.टी.एफ.प्रमुख श्री.प्रतीक देशमुख यांच्यासह प्रशालेचे प्राचार्य  , पर्यवेक्षिका , समन्वयिका, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केली.  त्यामध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गाण्यांवर ,  प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सायन्स थीम द्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांचा सन्मान केला तर  माध्यमिकच्या विद्यार्थिनींनी गुजराती गरबा आणि सी.टी. एफच्या विद्यार्थ्यांनी तलवारबाजी, लाठीकाठीचे उत्तम प्रात्यक्षिक सादर केले .यानंतर मान्यवरांच्या हस्ते इन्स्पायर मानक अवॉर्ड जिल्हास्तरीय निवड झालेल्या कु.स्वरांजली डांबे, कु.श्रेया पवार व कु.ऋषीराज फडतरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या दिनाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र काळेबेरे यांनी विद्यार्थ्यांच्या चौकस वृत्तीला चालना देऊन कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी योग्य दिशा देणे गरजेचे आहे असे सांगून सर सी.व्ही .रमण यांचा रमण इफेक्ट याविषयी विस्तृत माहिती दिली. विज्ञानातील संशोधनाचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.  या विद्यार्थ्यांमधून उद्याचे वैज्ञानिक तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी  विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक उपकरणाचे सर्वंकष परिक्षण केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री.भोजराज नाईक निंबाळकर यांनी शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.सौ. नीलम देशमुख यांनीही आपल्या मनोगतामध्ये विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनामध्ये एल.के.जी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान 3, आदित्य एल -१, सोलार इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, ग्रीन हाऊस इफेक्ट , इनक्युबेटर, मॉडर्न फार्मींग, हेल्दी फूडस्,जंतुनाशक फवारणी यंत्र, भूकंप सुचक यंत्र,जलविद्युत निर्मिती,अपघात सूचक यंत्र,रेन वाॅटर हार्वेस्टिंग,न्युटन्स & ओहम्स लाॅ, पवन ऊर्जा प्रकल्प इत्यादींसारखे नाविन्यपूर्ण १०० पेक्षा जास्त उपकरणे प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच विविध वैज्ञानिक 3D प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. गणित व विज्ञानावर आधारित रांगोळी यांचेही रेखाटन करण्यात आले होते. 

बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजी मंडई सह , विविध खाद्य पदार्थांचे स्टाॅल्स लावण्यात आले होते.यामुळे विद्यार्थ्यांना कृतीतून व्यवहार/व्यावसायिक कौशल्ये व ज्ञान आत्मसात करण्याचा वेगळा अनुभव मिळाला.यास पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद व बहुमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. अमित सस्ते, व सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर जाधव, यांनी केले तर आभार सौ.सोनाली निंबाळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने ,समन्वयिका सौ. सुवर्ण निकम व योगिता सस्ते यांच्यासह सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.