प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर एक्सलेन्स ऑफ आरसेटी (NACER) यांच्यावतीने आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीतील कामगिरीसाठी आयडीबीआय आरसेटी साताराचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आयडीबीआय आरसेटीला खालील श्रेणीत पुरस्कार मिळाले.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कौशल्यआधारीत विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यासंदर्भात प्रथम क्मांक, त्याचप्रमाणे स्वच्छता व व्यवस्थापकीय नीटनेटकेपणा या श्रेणीत प्रथम क्रमांक,तसेच आयडीबीआय आरसेटीने सर्वाधिक उमेदवार प्रशिक्षित करणे आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या श्रेणीत सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल आयडीबीआय आरसेटी साताराचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयडीबीआय आरसेटी सातारा, ही संस्था सातारा जिल्ह्यातील युवक युवतींना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गंत प्रशिक्षित करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात पोवई नाका सातारा येथे २०११ सालापासून कार्यरत आहे. सर्व सोयींनी सुसज्ज अशा या संस्थेत अनेक प्रशिक्षण कार्यक्रम अगदी विनामूल्य राबविले जातात. विविध श्रेणीत मिळालेले पुरस्कार हि आयडीबीआय आरसेटीच्या कामाची पोच पावती असून, सातारा जिल्ह्यातील युवक युवतींनी संस्थेच्या विविध प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार निर्मिती करून अर्थार्जन करावे असे आवाहन संस्थेचे संचालक श्री प्रशांत पाटील यांनी केले आहे.





Social Plugin