Ticker

6/recent/ticker-posts

भारत सरकारच्या नोटरी पदी धम्मानद देवळे


 कारंजा(प्रतिनिधी)  गुणवंत राठोड 

कारंजा येथिल ॲड. धम्मानद देवळे यांची आज भारत सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय विधी व न्याय विभाग,भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी दि. १५ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये कारंजा येथील ॲड. धम्मानद देवळे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲड. धम्मानद देवळे हे कारंजा येथिल दिवानी व फौजदारी न्यायालयात तसेच वाशिम, मगरुळपीर येथिल जिल्हा व सत्र न्यायालय येथे गेल्या 10  वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात तसेच  फुले शाहू आंबेडकर विचारधारा अतिमान करणाऱ्या चालवळीत अग्रेसर असतात. तसेच ॲड. धम्मानद देवळे हे नगर परिषद कारंजा च्या पॅनल वर तसेच खाजगी बँकेचे विधी सल्लागार सुद्धा आहेत.त्यांच्या नियुक्तीचे कारंजा परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. कायदेशीर दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे फार महत्त्वाचे आहे. व्यवहार योग्यरीतीने पार पाडले जातील, याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात, नोटरीची नियुक्ती सरकारी प्राधिकरणामार्फत केली जात असली, तरी सरकारकडून मोबदला मिळत नसल्याचे ऍड . धम्मानद देवळे यांनी नमूद केले.सदर निवडीबद्दल अड  धम्मानद देवळे यांच्या अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.