शहादा दिनांक १२/८/२०२६
अशोक पाटील (ग्रामीण प्रतिनिधी )
जय श्रीकृष्ण महानुभाव परिषद, शहादा, जि. नंदुरबार, यांच्या विद्यमाने आयोजित सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त लोणखेडा गावातून पाटीदार मंगल कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या भक्तिमय रॅलीमध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या महोत्सवाच्या निमित्ताने सर्वविद आचार्यप्रवर श्री गुरुवर्य श्री मोठेबाबा, जाधववाडी तसेच तत्त्वदर्शी वचन सर्विता आचार्य प्रवर श्री मोठेबाबा, शहादा आणि पंचक्रोशीतील उपस्थित संत-महंत तसेच समस्त भाविकांचे लोणखेडा नगरीत हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी बापूसाहेब दीपक पाटील, मकरंद पाटील साहेब,माधवीताई मकरंद पाटील यांची उपस्थिती लाभली. श्रीचक्रधर स्वामींच्या पवित्र विचारांचा आणि मानवतेचा संदेश जनमानसात पोहोचवणारा हा भक्तिमय सोहळा मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला.






Social Plugin