सर्जनशील गुणांमुळे लहान बालक महान ठरतात- चंद्रकांत चौधरी
युवराज कुरकुरे
दि 23 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा शालेय गुणवत्ता , सहशालेय गुणवत्ता , शालेय क्रीडा स्पर्धा गुणवंत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना रोख रक्कम व विविध प्रेरणादायी वाचणीय पुस्तके, शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर झोपे सचिव नाथ एज्युकेशन सोसायटी वरणगाव, प्रमुखपाहुणे चंद्रकांत चौधरी अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण, स्थापना 1917. ता. रावेर , सौ शीलांबरी जगदाळे, सौ .डॉ. अनुजा भोईटे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष संदीप चौधरी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता चौधरी यांनी प्रास्ताविकातुन कार्यक्रमाचा मुख्य हेतू स्पष्ट केला.
प्रमुख पाहुणे चंद्रकांत चौधरी यांनी मनोगत आतून सांगितले की लहान बालक सृजनशील गुणांमुळे महान ठरतात येथील सर्व शिक्षक वृंदांनी हे गुण विकसित करण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेला दिसून येतो . एक झाड लावू आता दोन झाडे लावू या पर्यावरण संवर्धनावर आधारित गीतातून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला छोटेसे बहिण भाऊ उद्याला मोठाले होवू या गीताचा आधार घेत विद्यार्थ्यांना गुणवंत, यशवंत, कीर्तीवंतव्हा असा विचाररुपी आशीर्वाद दिला.
सौ शिलांबरी जगदाळे यांनी पाणी वाचवा गुड टच बॅड टच बाबत विद्यार्थ्यांना माहिती तसेच मॅजिक शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद दिला. याप्रसंगी संस्थेचे संचालक अमोल पाटील डॉ. अनुजा भोईटे शिक्षक युवराज कुरकुरे यांची उपस्थिती लाभली. मुख्याध्यापिका संगीता चौधरी रेखा चौधरी विजय झोपे दिपाली राणे अनिता तडवी संध्या परतणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आथक परिश्रम घेतले.
पालक संघाचे किरण पाटील विजय इंगळे हजर होते. विद्यार्थी पालक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती जोशी यांनी केले. शिक्षकेतर कर्मचारी गणेश चौधरी राजू देवघाटोडे यांनी सहकार्य केले.





Social Plugin