कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन ९ मार्चला पक्षाध्यक्ष राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे साजरा करण्याचा निर्णय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. नाशिक शहर स्वागत कमानी, फलक, झेंड्यांनी शहर सजले आहे.
पक्षाचा वर्धापनदिन नाशकात होणार असल्याचे समजल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्हा मनसेमय झाला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी मनसेच्या तीन आम दारांना निवडून दिले होते, त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मनसेचे वर्धापन दिनाला विशेष महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे नाशिकमधून पक्षाचा उमेदवार देणार की महायुतीत सहभागी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत. वर्धापनदिन यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
वर्धापन दिन सोहळ्यासाठी राज ठाकरे ७ मार्च रोजी नाशिक येथे येणार असून , ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहे. राज ठाकरे वर्धापन दिनी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे राज साहेब व पक्षाचे इतर नेते काय बोलतात याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
.png)




Social Plugin