कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी मंठा.
मंठा: जायभाये कोचिंग क्लासेस मंठा येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन क्लासेसचे संस्थापक श्री. सचिन जायभाये सर व टीम यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष स्थानी श्री. सचिन जायभाये सर, मार्गदर्शक श्री. आकाश राठोड सर, पाहुणे म्हणून श्री. गणेश खिस्ते सर आणि सौ. स्वाती जायभाये मॅडम हे होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी गौरी केंधळे, श्रुती वायाळ, सृष्टी सांगोळे यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. वर्ग 10 मधून ऋतुजा ईघारे , दिपक मिसाळ, साहिल काकडे, मयुरी वरकड, शिवानी नेवरे , पवन जाधव, अजय घाटूळे, आदित्य वायाळ, नवनाथ गांजाळे, सपना गायकवाड तर वर्ग 9 वी मधून प्राची घुगे अजय पवार, संचिता शेंडगे, अदिती शिंदे आणि वर्ग 8 वी मधून सायली तोटे, उमेश वरकड, गोविंद जाधव, नंदिनी पुणेकर, संध्या मिसाळ, युवराज झोल, अमित राठोड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे श्री. खिस्ते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की,अभ्यासा शिवाय कोणतीही गोष्ट या जगात प्राप्त होऊ शकत नाही. आपण सध्या विद्यार्थी आहोत आणि आपण जे ठरवु ते होऊ शकतो, पण आधी ठरवीणे गरजेचे आहे. आपण शिक्षण घेऊनच मोठे होऊ शकतो व कोणतेही पद मिळवु शकतो, तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या नंतर या क्लासेस चे संस्थापक जायभाये सर आणि मार्गदर्शक श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी हे सागितले की, आपण कठोर मेहनत व अभ्यास करून काहीही मिळवु शकतो, त्यामुळे राहीलेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व परीक्षेत चांगले गुण घ्यावेत व वेळेचे नियोजन करुन प्रत्येक विषयाला सारखा वेळ द्यावा. विद्यार्थिनींनी लक्ष्मणरेखेचे उल्लंघन न करता आपल्या आई-वडिलांच्या सुचना आणि संस्काराचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वेळीच ध्येय निश्चित केले तर आपल्याला काय मिळवायचे आहे हे निश्चित करता येईल व यश प्राप्त करता येईल. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रास्ताविक सानिका महाजन आणि रोशनी राठोड यांनी केले. निरोप समारंभाच्या या कार्यक्रम प्रसंगी जायभाये कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





Social Plugin