कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासातील उद्दीष्टांचे स्थानिकीकरण या विषयावर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीयाचा सरपंच संवाद हा उपक्रम, क्वालिटी सिटी नाशिक अभियान आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सरपंचांनी विविध योजनांचा अभ्यास केल्याने गावाचा खऱ्या अर्थाने विकास होईल आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा आदिवासी कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रमांसह) दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रास ऑनलाईन हजेरी लावली. कार्यशाळेमध्ये नाशिक जिल्ह्यातील दोनशे पेक्षा जास्त अधिक सरपंचांनी उपस्थिती नोंदवली. गावस्तरावर या विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये याबाबतीत सरपंचांना सुसज्ज करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावात सलग २५ वर्षे सरपंच राहून त्यानंतर निवृत्ती घेण्याऱ्या व गावाला २२ पुरस्कार त्यामध्ये २ वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देणारे भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले.





Social Plugin