Ticker

6/recent/ticker-posts

मतदारसंघातील पत्रकार बांधवांसाठी सभा आयोजित

 


आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आज दिनांक 6 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री समाधान गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पत्रकार बांधवांसाठी सभा आयोजित करण्यात आली होती.

आज मा. उपविभागीय अधिकारी साहेबांनी सर्व पत्रकार बांधवांना आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी ची तयारी कशा पद्धतीने चालू आहे याबद्दल माहिती दिली.आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदारांची नोंद झाली असून एकूण 3 लाख 12 हजार 576 एवढे मतदार आहेत, त्यापैकी ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल 11 हजार 676 (3.74%)  तर शारीरिक विकलांग 2 हजार 889 (0.92%) नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 पेक्षा जास्त वयोगटातील आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर ५ दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ‘१२डी’क्रमांकाचा अर्ज सादर करावा. जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असून प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी करणार आहे.

दरम्यान, घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असेही गायकवाड सरांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूम बद्दल, कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंग बद्दल, मा. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सूचनाप्रमाणे सर्व माहिती पत्रकार बांधवांना सांगण्यात आली.

 आजचा सभेला सर्व पत्रकार बंधूंनी हजेरी लावली त्याबद्दल गायकवाड सरांनी त्यांचे आभार मानले आणि येणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 साठी त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्याची खात्री व्यक्त केली. आजच्या सभेला  मा. तहसीलदार श्री सचिन जैस्वाल सर, मा. नायब तहसीलदार श्री सातव सर, प्रसार व प्रचार समितीचे नोडल सहाय्यक श्री प्रकाश शिंदे सर , कोतवाल श्री राजेंद्र खरात हे सर्वजण उपस्थित होते...