Ticker

6/recent/ticker-posts

उल्हासनगर मध्ये निर्भय बनो सभेत भाजपा हटाव चा एल्गार सभा जेष्ठ पत्रकार निखिल वाघळे


सभेत राज्यातुन देशातुन भाजपाला हटवन्यासाठी शपथ घेण्यात आली 

प्रतिनिधि :  कृष्णा महाले उल्हासनगर                                                            

उल्हासनगर येथील सुभाष टेकडी परिसरातील तक्षशिला मैदानात निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. दरम्यान देशात राज्यात भाजपा व मोदी सरकार ने कशी अराजकता माजवली म्हणुन त्यांना देशातुन हद्दपार करायचे आहे, असा निर्धार या सभेत करण्यात आला आहे. या निर्धार सभेचे आयोजक व ज्येष्ठ पत्रकार किरण सोनावणे यांनी आपल्या भाषणात भाजपाने   देशात कशी वाट लावली हे अनेक उदाहरणे देवुन सांगितले आहे. या सभेचे प्रमुख वक्ते श्याम गायकवाड यांना या सभेचे अध्यक्षस्थान दिले होते,  परंतु त्यांनी अगोदरच आपले अभ्यास पुर्ण भाषण करुन देशातील फॅसिझम ला घालवायचे असा निर्धार करुन हिटलर व मुसोलिनी  यांच्या पेक्षा ही हे मोदी शहा अत्याचारी आहेत,  असे उपस्थित असलेल्या नागरिकाना समजावुन सांगितले. 

आता हीच वेळ आहे या भाजपाला हद्दपार करण्याची , असे सांगुन पुन्हा हे फॅसिस्ट सत्तेत आले,  तर या देशातील गोर गरीब बहुजनांचे काही खरे नाही. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे  यांनी सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले  की पत्रकार हा आरसा असुन तो दिव्या समान असतो . तो भ्रष्टाचाराचा प्रकाश हा दिव्या प्रमाणे उजेडात आणतो.  सध्या देशात लोकशाही धोक्यात आली असुन संविधान वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मी ह्या निर्धार सभा घेत आहे . वागळे यानी उल्हासनगर पोलिसांचे चांगला बंदोबस्त ठेवल्या बद्दल अभिनंदन करुन पुणे पोलिसांवर टिका केली . तर  सभेत   भाजपावर जोरदार टिका केली. या सभेला हजारो महिला पुरुषानी उपस्थित राहुन भाजपाला मतदान करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या सभेचे आयोजन माजी नगरसेवक राजेश वानखडे , रोहित साळवे , महेंद्र पंडागळे  यांनी केले  . यावेळी सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पोलिसांचा ताफा घेवुन चोख बंदोबस्त ठेवला. ही सभा यशस्वी करण्यासाठी संपत सपकाळ सह त्यांच्या सहकाऱ्यानी यशस्वी प्रयत्न केलेत.