गंगाराम उबाळे प्रतिनिधी सिंदखेड राजा
सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्र बेसहारा वृध्द महिलेची आर्थिक फसवणूक , अश्लील व जातिवाचक शिवीगाळ आणि विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिसांनी मलकापूर -पांग्रा येथील दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मलकापूर पांग्रा येथील साबेरखां सुलतानखां व जावेदखां साबेरखां रा. मलकापूर -पांग्रा अशी आरोपींची नावे असून पार्वती शंकर साळवे,वय ७० वर्ष,रा.मलकापूर पांग्रा असे पीडीत फिर्यादी महिलेचे नाव आहे. सदर घटना ६ नोव्हेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२३ चे दरम्यानची असून याबाबतच्या गुन्ह्यातील नोंद ३ मार्च २०२४ चे १८.४० वाजता पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेली फिर्याद व पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशा प्रकारे आहे की यातील आरोपी क्र.१ साबेरखां याने फिर्यादी महिलेकडून साक्षीदार समाधान राधाकिसन सोनुने याचे नावाने खरेदी खत करुन घेवून समाधान राधाकिसन सोनुने याचेकडून रू.४ लाखांचा चेक त्याचा स्वतः चा मुलगा आरोपी क्र २ जावेदखां याचे नावाने घेवून वटविला. फिर्यादीला पैसे न देता उपरोक्त आरोपी क्र 01 व 02 यांनी सदर चे पैसे स्वतः च ठेवून घेवून फिर्यादी व साक्षीदार यांची साडे तीन लाख रुपयाची फसवणूक केली आहे. तसेच फिर्यादी ही बेसहारा असून तिचे पती मरण पावले आहे.तिला मुलबाळ होत नसल्याने आरोपी यांनी तिचे एकटेपणाचा फायदा घेवून ती एक मागासवर्गीय समाजाची असल्याने तिला अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली आहे. अशाप्रकारच्या फिर्यादी चे तोंडी रिपोर्ट आरोपींविरुद्ध ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी आर्थिक फसवणूक, धमकी, जातीवाचक शिवीगाळ, अश्लील बाबी, विनयभंग आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
%20(1).jpeg)




Social Plugin