मारोती गाडगे
ग्रामीण प्रतिनिधी/कटचिंचोली
गेवराई (बीड):- दिनांक २९/०४/२०२४सोमवार रोजी कटचिंचोली येथे भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा स्थापन करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या मृतिची स्थापना करण्यात आली.कटचिंचोली येथे नवीन बुद्ध विहाराचे बांधकाम पुर्ण झाले या अनुषंगाने त्या विहाराला नाव "नालंदा" बौद्ध विहार कटचिंचोली आसे द्याण्यात आले.या वेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तन कार. ह.भ.पा.डॉ तुळशीराम महाराज खोटे यांनी अनमोल असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन पट सांगितला आणि बीड जिल्हाचे वक्ते, आवाज प्रमुख वक्ते शरद सदाफुले सर यांचे भाषण झाले. मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अंबड चे भंते,, यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाला सर्व धर्म गावातील युवा वर्ग व वरिष्ठ नागरिकांनी व दैठण चे सुशिल जामकर पाटील हे पन उपस्थित होते. व संदेश येवले पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर ऐक कविता म्हणून समाज बांधवांच्या काळजाला पाझर फोडला. अनेक युवा पिढी उपस्थित होती. .गावातील बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली.गावातील आजी,माजी सरपंच, शिक्षण समिती अध्यक्ष,उप अध्यक्ष, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक ह्या सर्वांनी उपस्थित लावली.





Social Plugin