Ticker

6/recent/ticker-posts

पाटणचे नुतन तहसिलदार अनंत गुरव यांनी पदभार स्वीकारला



पाटण, दिनकर वाईकर

सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धांदल सुरू आहे. तर दुसरीकडे पाणी टंचाई, त्यातच एप्रिलपासून शैक्षणिक नवीन वर्ष सुरू झाले असून या सर्व कामाचा उरकावा करत पाटणचे नूतन तहसीलदार अनंत गुरव यांनी आपला पद्‌भार स्विकारल्यापासून महिनाभरापूर्वीची असलेली पेंडिंगची सर्व कामे उरण्याचा सपाटाच लावला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण त्यांनी खोटी ठरवत शिल्लक कामांचा तात्काळ निपटारा लावल्याने सर्वसामान्य नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

यापूर्वीचे पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर गेली वीस ते बावीस दिवस विविध दाखले व इतर कामे रखडली होती. नोकरभरतीसाठी लगणारे विविध दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती. त्यामुळे पाटण तालुका नवीन तहसीलदारांच्याकडे डोळे लावून बसला होता. कोणताही अधिकारी पाटण तालुका म्हटल्यांवर नाक मुरडत होता. मात्र पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी पाटण तहसील कार्यालयाचा पद्‌भार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात केली.

पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाडे यांना तीन-चार वर्षाचा असणारा पाटण तालुक्याचा अनुभव हा नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. अनंत गुरव हे तहसीलदार म्हणून आल्यापासून प्रांताधिकारी सुनील गाडे यांच्याशी समन्वय साधून पाटण तालुक्यात शिल्लक असणारी कामे केली. शिवाय विविध दाखले दिलेच पण त्यातूनही अधून-मधून गटविकास अधिकारी यांच्याकडून पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील विविध असणाऱ्या मतदान केंद्राची पाहणी करत अधिकाऱ्यांचा आढावा बैठका घेत आहेत. पाटण तालुक्यात कोणाचाही शैक्षणिक दाखला थांबणार नाही व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रीय केले आहे.

सध्या लोकसभा निवडणूक, तीव्र पाणीटंचाई, मार्च एंडिंगची कामे व विद्यार्थ्यांना लागणारे दाखले ही सर्व कामे एकाचवेळी आल्याने नागरिकांनीही महसूल विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असे मत तहसीलदार अनंत गुरव यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले आहे.


अनंत गुरव यांनी तहसीलदार पदाचा चार्ज घेतल्यानतंर प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली डोमासाईल 853, अल्पभूधारक 59, उत्पन्न 1 हजार 425, रहिवाशी 44, ज्येष्ठ नागरीक 2, डोंगरी दाखला 7, शेतकरी दाखला 3, जातीचे दाखले 383, नॉन क्रिमिलिअर 128, भूकंपग्रस्त 130, कुणबी 102 असे विविध दाखले देण्यात आले. याकामी त्यांना नायब तहसीलदार पंडीत पाटील यांच्यासह महसूल कर्मचारी व सेतू विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कामे केल्याने विद्यार्थ्यांसह नागरीकांची कामे वेळेत मार्गी लागली.