Ticker

6/recent/ticker-posts

महापुरुषांचे जयंती निमित्त लावलेला शुभेच्छाचा बॅनर फाडल्यामुळे मुळावा येथे तणाव

 


बाळासाहेब पवार प्रतिनिधी

महापुरुषांचे जयंती निमित्त मुळावा बस स्थानकात शुभेच्छा चा सामाईक बॅनर लावण्यात आला होता. तो बॅनर एका समाजकंटकांने फाडला. सदर घटना दि. 11 एप्रिल च्या दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे मुलावा येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. ठाणेदार श्री. पंकज दाभाडे यांनी जमावास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला व पोलिसांनी सबंधितास अटक करून पोलीस स्टेशन पोफळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.