लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे भव्य कार्यक्रम दिनांक 9/4/2024 रोजी वार मंगळवार गाव किनगाव जट्टू येथील श्रीराम मंदिरासमोर संध्याकाळी ठिक सहा वाजता जाहीर सभा होणार आहे.तरी या सभेला परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.2024 ची बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक ही फार मोठा रंगात दिसून येते आहे. कारण सलग पंधरा वर्ष खासदार असलेले प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शेतकरी नेते व गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा रविकांत तुपकर हे सर्व मैदानात उतरले आहे.
रविकांत तुपकर यांनी दोन एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करता वेळेस जिल्ह्याभरातून नव्हे तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते यावेळी कोणत्याही परिस्थितीत रविकांत तुपकरांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्याचा निर्णय नागरिकांनी केला आहे तसेच उद्या 9 एप्रिल पासून रविकांत तुपकर हे सिंचन राजा येथील मा जिजाऊ साहेब यांना अभिवादन करून सकाळी दहा वाजता नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणार आहे ठीक संध्याकाळी सहा वाजता लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे भव्य प्रचार सभा घेणार आहे या सभेला परिसरातील शेतकरी बंधू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहदेव लाड यांनी केले आहे





Social Plugin