Ticker

6/recent/ticker-posts

देवडोंगरी येथे आई फाऊंडेशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन



ग्रामीण प्रतिनिधी: देवडोंगरी 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बाफणविहीर येथील आई फाऊंडेशन, सामाजिक संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य, शैक्षणिक, क्रिडा या प्रकारातील विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सौ. वृषाली तुंबडे, उपाध्यक्ष प्रल्हाद बाम्हणे, सचिव संजय पागी, खजिनदार सुभाष तुंबडे, संचालक धिरज पागी, भरत दरोडे, भगवान निंबारे, विठ्ठल गावित, राजेंद्र तुंबडे, मार्गदर्शक रामदास तुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सालाबादप्रमाणे ग्रामपंचायत देवडोंगरी येथे आई फाऊंडेशन चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

    या क्रिकेट स्पर्धा सहा षटकांचे असुन सहा पारितोषिके व रोख रक्कम बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धा सात दिवस खेळविण्यात आल्या एकुण ४८ संघ सहभागी झाले होते. पैकी सहा संघ विजयी झाले. पंचाची जबाबदारी रामकृष्ण निंबारे देवडोंगरी, विठ्ठल पागी गौळपाडा यांनी तर कॅमेट्रीमॅन दिपक निंबारे गौळपाडा यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. प्रथम क्रमांक कोटंबी पैकी बेहेडपाडा, द्वितीय क्रमांक ठाणापाडा पैकी तुंगारपाडा, तृतीय क्रमांक ओझरखेड, चौथा क्रमांक खरशेत, पचवा क्रमांक चिंचओहोळ, सहावा क्रमांक भुतमोखाडा असे सहा विजयी संघ असुन नाशिक येथील श्रीमंडप डेकोरेटर्स जितेंद्र निरभवणे, लोकमत पत्रकार हेमंत पवार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह व्यवस्थापक विलास चव्हाण, अनिल परदेशी, मनोज बांगे तसेच आई फाऊंडेशन संस्थेचे मार्गदर्शक रामदास तुबडे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नियोजन समिती बळीराम पागी, रविंद्र दळवी, मधुकर दाहवाड, मोहन गहले, संदिप दाहवाड, शार्दुल पागी, तसेच मोठ्या संख्येने प्रषेक ग्रामस्थ उपस्थित होते.