Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या वतीने दावत- ए- इफ्तार पार्टीचे आयोजन


प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर 

     दरवषी प्रमाणे याही वर्षी  माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज सेवक शिवाजी रगडे यांच्या वतीने सम्राट अशोक नगर उल्हासनगर तीन सुन्नी जामा मज्जिद, फातिमा मज्जिद रेणुका सोसायटी, अंजुमन इस्लाहुल मज्जिद गांधी नगर ,एकत्र ईप्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच  रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मत समाजसेवक शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले.

 यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना ते म्हणाले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.हिंदू मुस्लीम बांधव एक मेकांच्या सनात एकत्र येत असतात  डॉ. बाबसाहेब जयंती असो किंवा राम नवमी, रमजान ईद असो सर्व हिंदू मुस्लीम बांधव सहभागी होवुन सण एकत्र साजरा करत भाई चाराचा सलोखा राखून एक वेगळा संदेश  देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणे सुद्धा महत्त्वाचे आहे.सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे

दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधु भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. तसेच यावेळेस अब्दुल भाई,समाजसेवक महेश आहुजा, सीमा आहुजा, गजानन शेळके, मा.सविता तोरणे, फिरोज खान, कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते