परिसराचा आढावा घेत केली प्रशंसा
चोहोटटा बाजार
लोकसभा निवडणुक आणि सार्वत्रिक उत्सव मिरवणुका या पार्श्वभूमीवर दहीहांडा पोलिस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अकोला पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी दहीहांडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देत परिसरातील समस्या जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांना कार्यपद्धतीची प्रशंसा केली. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्ष श्री मित्तल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रभारी श्री ठाकरे उपस्थित होते.
दरम्यान मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी पोलीस स्टेशनची पाहणी करून पोलीस स्टेशन मधील सर्व विभागांची तपासणी केली तसेच पोलीस स्टेशन मधील सर्व समस्या जाणून घेऊन त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी तात्काळ आदेश दिलेत. सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांची बैठक घेत त्यांच्या व्यक्तिगत समस्या जाणून घेऊन सर्व पोलीस अमलदारांचे समस्याचे तत्काळ निवारण करण्यासंबंधी सूचना देत ग्रामीण भागात काम करीत असताना लोकांच्या समस्या जाणून त्या समस्या कायद्याचे चौकटीत राहून तात्काळ सोडविणे आवश्यक असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकी जपणे, सोशल मीडिया सायबर क्राईम याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, प्रभावीपणे हद्दीत रात्र गस्त घालून लोकांचे मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या दामिनी पथकाद्वारे महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी दहीहांडा येथे जिल्हा हद्दीत लावण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथक येथे भेट देऊन तेथील अधिकारी यांना सुद्धा मार्गदर्शन करून त्यांचे कामकाजाची पाहणी केली.
विशेष म्हणजे सूर्य आग ओकत असतानाही कडक उन्हात पोलीस अधीक्षक साहेब यांनी एसी कॅबिन मध्ये बसून आदेश न देता सर्वसामान्य लोकांसाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या तळमळीचे कौतुक होत आहे. दहीहांडा पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्व बाबींची पाहणी करून सर्व समस्या जाणून घेऊन त्याबाबत तात्काळ आदेश देऊन निवारण केले. पोलीस अधीक्षक साहेब यांचे भेटीदरम्यान पोलीस स्टेशन मधील अधिकारी अमंलदार यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शनाची प्रशंशा करून मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे समाधान सर्व कर्मचारी व्यक्त करीत आहेत.





Social Plugin