Ticker

6/recent/ticker-posts

पाणीपट्टी थकबाकीदारांना पाणीपुरवठा विभागाचा दणका



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक -  पाणीपट्टी थकबाकीदारांना आवाहन करुनही त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्यांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दणका दिला आहे. मनपाने महिनाभरात ६४९ नळ कनेक्शन तोडले असून ही कारवाई सुरूच राहण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. कारवाई टाळायची असेल तर थकबाकी भरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

शहरात एकूण दोन लाख सात हजार इतके नळजोडणी मालमत्ताधारक आहेत. यापैकी ४४ हजार ३८५ नळ जोडणीधारक थकबाकीदार असून, त्यांच्याकडे पाणीपट्टी थकीत आहे. मनपाच्या कर विभागाकडून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीची वसुली करण्यात आली. या दोन्ही विभागांनी आता संयुक्त मोहीम हाती घेत थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे थकबाकीदारांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा बडगा उगारला असून महिनाभरात तब्बल ६४१ नळ कनेक्शन तोडले आहेत. 

२२ फेब्रुवारी २०२४ पासून मनपाने नळ तोड मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी १५ स्वतंत्र पथके निर्माण करुन प्रत्येक पथकात एका अधिकाऱ्यांसह विभागानुसार कारवाई सातपूर १३३ सिडको २९८ नाशिक पश्चिम ०६ पंचवटी ८२ पूर्व ०८ नाशिकरोड ११४ एकुण ६४१ एकूण चार जणांचा समावेश आहे.