प्रतिनिधी- हितेश मेश्राम
तालुक्यातील अनेक भागाला 7 व 9 मे रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसाचा सर्वाधिक फटका उन्हाळी थानाला बसला आहे. कापणीस आलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले असून संबंधित यंत्रणेने मौका पाहणी करून नुकसानग'स्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या अर्चना मडावी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात गत काहि दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस कोसळत आहे. तालुक्यात सिंचन सुविधा व जलाशच्या पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धान, भाजीपाला, फळबागांची लागवड केली आहे. तालुका जंगलव्याप्त, दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग'स्त आहे. येथे शेती शिवाय दुसरा पर्याय नाही. वनोपज व शेतीवरच तालुक्याचे आर्थिक गणित आहे.
मात्र सततच्या अवकाळी पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. तालुक्यात 7 व 9 मे रोजी झालेल्या वादळी अवकाळी पावसाने धान, भाजीपाला, फळबाग पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनस्तरावरून तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अर्चना मडावी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे..





Social Plugin