Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त मा. आ. नामदेवरावजी ससाने विधानसभा सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ


बाळासाहेब पवार प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त शासन परिपत्रकानुसार एक मे 2024 रोजी चा महाराष्ट्र दिन तहसील कार्यालयाच्या ठिकाणी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर परिपत्रकानुसार अंमलबजावणी करणे बाबत सूचित केले आहे. 

बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता तहसिल कार्यालयाचे  मैदान  येथे राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी  विधानसभा सदस्य मा. आमदार नामदेवरावजी ससाने  यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.  महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित या मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोशाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार आर यु सुरडकर यांनी केले आहे.