सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
चिखली प्रतिनिधी / राहुल डोंगरदिवे
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथिल संजय नरहरी खेडेकर ह्या ३० वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व सततची नापिकीला कंटाळून दिनांक १६ मे रोज गुरुवारला वेळ १२ वाजेच्या दरम्यान गट नंबर ९९२ भाग दोन मधील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.या घटनेची माहिती अंत्री खेडेकर येथील सरपंच व पोलीस पाटील यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला याची माहिती दिली असता अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी कैलास उगले व वायाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचासमक्ष पंचनामा करून संजय नरहरी खेडेकर चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे पाठवण्यात आला.
आत्महत्याग्रस्त संजय खेडेकर यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याचे माहिती मिळाली असून डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची याच विवचंनेत होते त्यांच्या नावावर तीन एकर जमीन आहे मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली,एक मुलगा असा परिवार असून मन मिळाऊ स्वभावाच्या संजय खेडेकरच्या आत्महत्याने संपूर्ण अंत्री खेडेकर गावासह परिसरामध्ये व्यक्त होत आहे.
.jpg)




Social Plugin