Ticker

6/recent/ticker-posts

आमखेडा येथील भूमी कॄषी पर्यटन केंद्रास आंतरराष्ट्रीय कॄषी पर्यटन पुरस्कार



संजय भरदुक मंपीर प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण 

    १६ में २०२४ रोजी युरेका रिसर्च सेंटर बोल्झानो इटली येथे संपन्न झालेल्या १७ व्या जागतिक कॄषी पर्यटन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील आमखेडा, येथील भूमी कॄषी पर्यटन केंद्रास युरेक संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते जागतिक कॄषी पर्यटन पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.दिनांक १६ मे ते १८ मे दरम्यान बोल्झानो उत्तर इटली येथे जागतिक कॄषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून युरेक रिसर्च, ग्लोबल ॲग्री टुरिझम नेटवर्क आणि कॄषी पर्यटन विकास संस्था बारामती या तीन संस्थांच्या एकत्र विधमाने दुसऱ्या जागतिक कॄषी पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कॄषी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, सरकारी विद्यापीठे, संशोधन करणारे प्राध्यापक, शेतकरी वर्ग संस्था या स्तरातून ७० देशातील ३८० प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे यंदाही कॄषी पर्यटन राबवणारे शेतकरी, संस्था आणि व्यक्ती यांचा जागतिक कॄषी पर्यटन पुरस्कार २०२४ देऊन सत्कार करण्यात आला २४ देशातील ३७ अर्ज या पुरस्कारासाठी प्राप्त झाले होते यातून निवड समितीने दहा अर्जाची निवड केली असून यात अमेरिकेतील चार व भारतातील दोन व आलाबामा येथील एक व आस्टैलिया येथील दोन तर तैवान येथील एक अशा कॄषी पर्यटन केंद्राचा समावेश आहे.वाशिम जिल्हातील आमखेडा येथील भूमी कॄषी पर्यटन केंद्र मागील वीस वर्षांपासून कॄषी संस्कृतीचे जतन व संवर्धन करते.     महात्मा गांधींनी घालून दिलेल्या पंचसूत्री च्या आधारे अन्न , वस्त्र, विद्युत, स्वास्थ्य व शिक्षण स्वावलंबन या पंचसूत्री वर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग या पर्यटन केंद्रास पहावयास मिळतात. एकत्र कुटुंब पद्धती व स्वावलंबी गाव या स्वयंपूर्ण पद्धतीवर मागील वीस वर्षांपासून पर्यटन केंद्र मार्फत इथे कार्य सुरू आहे.वाशिम जिल्हात कॄषी पर्यटन बरोबर सामाजिक अध्यात्मिक पर्यटन केंद्र २१ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. कॄषी पर्यटन केंद्राच्या भरीव कार्याची दखल घेत यंदाच्या जागतिक कॄषी पर्यटन पुरस्कार २०२४ देण्यात आला या कार्यक्रमाला विविध देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. ग्लोबल टुरिझम नेटवर्कचे आजी व माजी अध्यक्ष, सचिव तसेच युरेक संस्थेचे चेअरमन आणि कॄषी पर्यटन विकास संस्थेचे कार्यकारी संचालक यांच्या हस्ते भूमि कॄषी पर्यटन केंद्राचे संचालक अविनाश जोगदंड यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.एकत्र कुटुंब पद्धती व जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी ध्येय यामुळे भूमी कॄषी पर्यटन केंद्राने मजल मारली आहे असे अविनाश जोगदंड यांनी कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले वाशिम जिल्ह्यातील इतर कॄषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास उत्सुक संस्था व शेतकरी यांनी पुढे आल्यास आम्ही नक्कीच तांत्रिक सहाय्य करू असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमादरम्यान वाशिम जिल्ह्यातील पर्यटन बाबतची चित्रफीत सर्वांना दाखविण्यात आली.अशी ही माहिती राजेश घुगे उपाध्यक्ष सामाजिक विभाग आमखेडा गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे .