गोविंदपूर : माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर या छोट्याशा गावात गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. गणरायाच्या आगमनाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले असून, दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव तसेच सर्व सदस्य मोठ्या उत्साहाने काम पाहत असून, कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत असून महिला, युवक व बालकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
गणरायाच्या आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांमुळे गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषाने संपूर्ण गोविंदपूर परिसर दुमदुमून गेला आहे.





Social Plugin