Ticker

6/recent/ticker-posts

वाहन चोरी प्रकरणात विधी संघर्शित बालकासह सात जणांना अटक-स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



बाळासाहेब पवार प्रतिनिधी

उमरखेड अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून वन आगारात ठेवले होते. सदर वाहन १ एप्रिल रोजी आगारातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. सदर प्रकरणात तब्बल दीड महिन्याने एका विधी संघर्ष बालकासह सात आरोपीस अटक करण्यात आली. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १५ रोजी करून सय्यद समीर सय्यद करीम (२०), शाहिद खान जावेद खान (१९), शेख जुबेर शेख जब्बार (१९), मस्तान खान मलंग खान (२०) सर्व रा. नागापूर रूपाला सह शेख वाजीद उर्फ शेख सरदार उमर (२४) रा. ताजनगर हिंगोली नाका, भंगार दुकानदार एजाज काजी शिरजुद्दिन (३६) रा. नांदेड व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. 

अवैध उत्खनन करून वाहतूक करताना शंकर हरकरे यांचे एम.एच.२७ सी.०५२० क्रमांकचे वाहन वन अधिकारी यांनी पकडुन जप्त केले व कारवाई होई पर्यंत नागापूर रूपाला येथे वन आगारात ठेवले होते. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकर, रमेश राठोड यांनी पार पाडली.