![]() |
| महावितरण अभियंता यांना निवेदन देताना शिवसेना ऊबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे, गजानन जाधव व इतर मान्यवर |
लोणार:- प्रतिनिधी अनिल वायाळ
विजेचा लपंडाव बंद करा अन्यथा महावितरण कार्यालयावर जनसामान्यांचा मोर्चा काढू असा इशारा शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी दिला.लोणार शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा वीज पुरवठा हा सदोष आहे सतत वीज खंडित होत आहे दिवसातून पंधरा ते वीस वेळा वीज खंडित होते आणि या विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे व यास संपूर्ण तयार महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे
विजेच्या दबावातील कमी जास्त वीज प्रवाहमुळे सामान्य जनतेचे टीव्ही, फ्रिज, पंखे, विजेच्या मोटारी, विजेचे दिवे, हे जळून जात आहेत निकामी होत आहेत याकरिता वीज कंपनीने आपला ढिसाळ कारभार दुरुस्त करून घ्यावा व वीज ग्राहकांना अखंडित वीज देण्यात यावी नसता लोणार येथील महावितरण कार्यालयावर जनसामान्यांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी महावितरण चे अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला. याप्रसंगी शिवसेनेचे सुदन अंभोरे, तानाजी मापारी, श्रीकांत नागरे, श्रीकांत मादनकर, लूकमान कुरेशी, इकबाल कुरेशी, अजय बछीरे, गणेश पाठे, अमोल सुटे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.





Social Plugin