मनमाड प्रतिनिधी --धमेंद्र वेताळ
मनमाड शहरातुन राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते त्यामुळे मनमाड शहरातून मोठ्या प्रमाणात एक्सीडेंट ची संख्या ही वाढत चालली शाळा महाविद्यालयामध्ये जाणारे खाजगी क्लासेस ला जाणारे विद्यार्थी आणि अवजड वाहनांमुळे या अपघाताच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे म्हणून आज मनमाड शहरात कॅम्प परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यांची एकच मागणी आहे की मनमाड शहराला बायपास रस्ता असावा आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी स्पीड बेकर निर्माण केले पाहिजे त्यातून गाड्यांचा वेग कमी होईल अशा पद्धतीची मागणी शहरातून नागरिकांनी केली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चक्काजाम आंदोलन उभे केलेले आहे.





Social Plugin