Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड शहरातील सिडको-हडको भागात रॉडरोमिओ पुन्हा सक्रिय



शाळा मार्गावर धूम स्टाइल दुचाकी सुसाट ; कर्णकर्कश आवाजाने विद्यार्धी हेराण .

नांदेड/भारत वानरे

नांदेड शहरामधील आणि सिडको -हडको भागातील शाळा ,महाविद्यालय आता गजबजले असुन या परिसरातील मुख्य रस्त्यावर रोडरोमियो पुन्हा सक्रिय झाले आहेत.शाळा भरताना आणि सुटण्याच्या वेळेत मार्गावर धूम स्टाईल मध्ये दुचाकी  सुसाट वेगाने चालवत आहे त्यातच भर म्हणजे कर्णकर्कश्श आवाज करत महिला ,मुलींना छेडण्याचा प्रकार वाढल्याने विध्यार्थी व पालक वर्ग हेरान झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.

   नवीन नांदेड भागातील सिडको हडको या परिसरामध्ये काही नामाकीत शाळा व महाविद्यालये आहेत .या शाळा आणि महाविद्यालया मध्ये शहरी आणि ग्रामीण भागातून बरेच विध्यार्थी आणि विध्यार्थिनी शिकसेंन घेण्यासाठी येतात शाळा आणि महाविद्यालय भरण्याच्या वेळेत शाळेच्या समोर रोड रोमियोच्या वाहनाच्या रांगा लागल्या असतात तरी अनेक पालक वर्ग आपल्या मुलां ,मुलींना आप आपल्या घरगूती वाहनांनी आणून सोडत असतात .

      या मध्ये हे रॉड रोमियो जे पालक वर्ग आप आपल्या मुलींना शाळा व महाविद्यालया मध्ये आणून सोडता वेळेस त्याच्या पाठीमागून येऊन त्याच्या गाडीचा मोठयाने हॉर्न वाजवून मुलींना छेडण्याचे खूप प्रकार वाढत आहे आणि शाळा सुटता वेळेस पालक  वर्गाच्या  वाहनाचा पाठलाग करत विद्याथी पालक वर्गाच्या वाहनाला धूम स्टाईल मध्ये कटा मारत शाळा व महाविद्यालय येई परेनत पाठलाग करतात.या रॉड रोमियो मूळे विध्यार्थी आणि पालक वर्गाच्या मनाला भीती वाटत आहे.आपल्या मुलाच्या भवितव्याचे कसे होईल . काही रोड रोमियो शाळा व महाविद्यालया समोर बसुन विद्यार्थिनीकडे पाहून असलील हावभाव करत आहे.