बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान भारत सरकार यांच्या योजनेतून स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या समूह विद्यापीठाच्या कुलगुरू पदी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय साताराचे प्राचार्य प्रिं डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती श्री रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रो. डॉ. डी टी शिर्के, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ विजय कुंभार, विद्यापीठाचे अधिकारी डॉ. धनाजी जाधव, डॉ. हेमंत उमाप यांनी अभिनंदन केले. अभिनंदन प्रसंगी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. राजन मोरे, प्रा. डॉ. विठ्ठल सावंत, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, संस्थेचे सहसचिव (ऑडीट) प्रिं डॉ. शिवलिंग मेंकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री. बंडू पवार, घटक
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रिं डॉ. राजेंद्र मोरे, प्रिं डॉ. बी. टी. जाधव प्रभारी उप-कुलसचिव सौ. बीना निपाने, श्री, बापू अवताडे यांनी अभिनंदन केले. प्रिं डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे झूलॉजी विषयाचे प्राध्यापक असून रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य म्हणून त्यांची एकूण ३९ वर्षे सेवा झालेली आहे ते सध्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या समूह विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती होणे हा सर्वसामान्य रयत सेवकासाठी अत्यंत मोठा बहुमान आहे असे मत प्रिं डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
कर्मवीर विद्यापीठ हे एक समूह विद्यापीठ असून, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा या तीन महाविद्यालयाचे मिळून विद्यापीठ निर्माण करण्यात आलेले आहे. या विद्यापीठात सध्या या तीन महाविद्यालायाबरोबरच स्कूल ऑफ अडव्हान्सड कॉम्प्यूट्युशनल स्टडीज, स्कूल ऑफ हुम्यानिटीज अँड लिबरल आर्ट्स, स्कूल ऑफ बँकिंग फायनान्स अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ फाईन आर्ट्स, स्कूल ऑफ फॉरेन लँग्वेजेस या प्रशाला कार्यरत आहेत. विविध प्रशालांबरोबरच समाजोपयोगी संशोधन व प्रबोधन कार्य सुरू करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील चेअर इन सोशल इंक्ल्यूजन, सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील चेअर इन वूमेन इम्पॉवरमेंट, फायनान्शिअल इंक्ल्यूजन चेअर आणि चेअर इन सायन्स फॉर सस्टेनेबल सोसायटी ही अध्यासने स्थापन केलेली आहेत. विविध अध्यासने, प्रशाला व केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी रयत शिक्षण संस्था व महाराष्ट्र शासन विशेष प्रयत्न करीत आहे.





Social Plugin