Ticker

6/recent/ticker-posts

एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेल्या किंवा दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार जोडप्यांचा सत्कार समारंभ"


प्रतिनिधी प्रशांत सोनवणे 

दि.११ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय सांगली, यांच्यावतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय सांगली, यांच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त " एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेल्या किंवा दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार जोडप्यांचा सत्कार समारंभ" जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त " एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेल्या किंवा दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार जोडप्यांचा सत्कार समारंभ" गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी विभाग नियंत्रक कार्यालय , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय सातारा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.मोहन पलंगे साहेब विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा .श्री .रेवणनाथ भिसले साहेब, सहाय्यक कामगार आयुक्त, , या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा.सौ.शकुंतला पवार मॅडम डी.जी.एम .एच. आर ,मुथा ग्रुप ऑफ फाउंड्री सातारा, मा .श्री.सचिन सापते साहेब,संपादक ,राजमुद्रा न्यूज सातारा. श्री श्रीकांत देशमुख साहेब ,प्रशासकीय अधिकारी, सातारा डायग्नोसिस हॉस्पिटल सातारा. या मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण सात सुखी जोडप्यांचा शाल ,श्रीफळ, हार, व पाच हजाराचा धनादेश देऊन सत्कार खालील जोडप्यांचा करण्यात आला.

    १) सौ. राजबाला महेश अलगुडे, श्रीराम बाजार, श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लिमिटेड फलटण.२) श्री विठ्ठल शिवाजी चव्हाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा३) श्री राजेश भालचंद्र निंबाळकर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड फलटण ४) श्री प्रकाश रंगराव भोसले राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना राजाराम नगर इस्लामपूर ५) श्री सचिन रामचंद्र लाड यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुक ,कराड६) श्री संदीप भानुदास शिंगटे, मुथा फौंड्री प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी सातारा७) श्री.कृष्णदेव विठोबा जाधव श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड फलटण ,इत्यादी कामगार व कामगार कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. रेवणनाथ भिसले साहेब यांनी सातारा जिल्ह्यामधील कामगार वर्गांना मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच कामगार कल्याण केंद्र सातारा या इमारत बांधकाम करण्याचे करिता जे काय सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले.         कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रोहन पलंगे साहेब यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना उपक्रम याचा लाभ घ्यावा व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा जिल्ह्यातील कामगारांचे 100% नोंदणी केली जाईल व जास्तीत जास्त लाभ कामगार मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख उपस्थितीमध्ये मा.सौ. शकुंतला पवार मॅडमनी कामगार कल्याण मंडळ सातारा या कार्यालयास सहकार्य करण्याचे आश्वासन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा .श्री.संभाजी पवार कामगार कल्याण अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ,सूत्रसंचालन व आभार श्री .संदीप कांबळे केंद्रप्रमुख कामगार कल्याण केंद्र सातारा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता श्री सोमनाथ चोरगे, श्री गणेश कुंभार, श्री प्रेम भोसले, सौ सुजाता जाधव, सौ तृप्ती निकम, सो ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाबाबत कामगार वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह जाणवला तसेच कौतुक ही करण्यात आले.