किनवट प्रतिनिधी शेख अमिरपशा
किनवट तालुक्यातील निचपुर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्यांनी पंचायत समिती किनवट येथे 09/07/2024 रोजी पासून आमरण उपोषण सुरुवात केले. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांना ग्रामपंचायत निचपुर येथील विविध विकास कामाचा तांडा वस्ती,दलित वस्ती,पेसा,15 वा वित्त आयोग अशा झालेल्या विविध कामाची मोजमाप पुस्तिका व खात्याचे स्टेटमेंट या सर्व बाबीची मागणी करून सुद्धा त्यांना प्रशासनाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या कारणांनी त्यांना आमरण उपोषणाला बसण्यास भाग पाडले.
प्रशासनाने त्यांना कुठली माहिती न पुरवल्यामुळे विकास कामाच्या नावाखाली लूट करण्यात आली असे समजले जाते. उपोषणा तीन दिवस पूर्ण होऊन सुद्धा प्रशासन कुठली दखल घेत नाही या मागचे सुद्धा कारण प्रशासनाने उपोषण कर्त्यांना द्यावे. ग्रामपंचायत मधील उपसरपंच व सदस्यांना जर काय माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेच काय?असाही प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने निचपुर येथील ग्रामपंचाय तिची दखल घेऊन त्यांना योग्य ती माहिती पूर्ण द्यावी. व सर्व बाबींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. उपोषण कर्ते बालाजी डोईफोडे( उपसरपंच ग्रामपंचायत निचपुर) शंकर अंकुरवार( ग्रा.पं.सदस्य) आडेलू घुगेवाड( ग्रा.पं.सदस्य) व्यंकट डोईफोडे( ग्रामस्थ निचपुर) बळीराज कागणे( ग्रामस्थ निचपुर) यांनी अशी मागणी केली.
Social Plugin