Ticker

6/recent/ticker-posts

ब्राम्हणवाडा येथील विकासकामाचे डॉ. महेश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन



 गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी 

ब्राम्हणवाडा येथे एक महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन डॉ. महेश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. पेवर ब्लॉक रस्ता तांडा सुधार योजने अंतर्गत हे काम पालकमंत्री मा. ना. संजय भाऊ राठोड यांच्या निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. 

डॉ. महेश भाऊ चव्हाण यांनी शासकीय स्तरावर प्रयत्न करून हे काम शक्य केले आहे. भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित रहून त्यांनी गावातील समस्यांवर चर्चा केली आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात गावातील सरपंच सौ. मायाताई मुंदे, सौ. मीनाताई रामदास भोने (जिल्हा परिषद सदस्य), श्री. विशाल भाऊ घोडे (पंचायत समिती सदस्य), पंजाबराव पा. मुंदे, मस्तान शहा, शंकरराव बांडे, विष्णु मुंदे, अजाबराव मुंदे, लक्ष्मण मुंदे, दत्ता मुंदे, सदानंद इंगळे, सौरभ पाटील मुंदे, गौरव मुंदे, संग्राम सोनबावणे, शिवाजी दावले, मंगेश सोनबावणे, चेतन मुंदे, संदीप मुंदे, राहुल बाजड, ग्रामस्थ आणि मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

गावातील रस्त्यांची दुरुस्ती झाल्यावर रहिवाशांना सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होईल. यामुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल आणि गावाचा विकास होईल. डॉ. महेश भाऊ चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गावातील इतर समस्यांचेही निराकरण होईल अशी अपेक्षा आहे.